📌 थोडक्यात माहिती: महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (MAHA CID), पुणे द्वारे “सहायक शासकीय दस्तऐवज परिक्षक (गट-क)” या पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 12 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली असून अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2026 आहे.
📊 भरतीचा सविस्तर तपशील (Recruitment Details)
| विभाग / संस्था | गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे (MAHA CID Pune) |
|---|---|
| पदाचे नाव | सहायक शासकीय दस्तऐवज परिक्षक (गट-क) |
| एकूण रिक्त पदे | 16 पदे |
| वेतन श्रेणी (Salary) | एस-१५ : रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/- (अधिक भत्ते) |
| नोकरीचे ठिकाण | पुणे, महाराष्ट्र |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन (Online) |
| अधिकृत वेबसाईट | mahacid.gov.in |
🎓 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून रसायनशास्त्र (Chemistry) आणि भौतिकशास्त्र (Physics) या विषयां सह प्रथम किंवा द्वितीय श्रेणीत विज्ञान शाखेतील पदवी (B.Sc.) किंवा बी.एससी. फॉरेन्सिक सायन्स (B.Sc. Forensic Science) उत्तीर्ण असावा.
- महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाद्वारे जारी केलेले संगणक हाताळणीचे प्रमाणपत्र (MS-CIT किंवा समकक्ष) असणे आवश्यक आहे.
- मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक. (गुजराती व उर्दू भाषेचे ज्ञान असल्यास अतिरिक्त प्राधान्य).
⏳ वयोमर्यादा व अर्ज शुल्क (Age Limit & Application Fee)
वयोमर्यादा:
- खुला प्रवर्ग: १८ ते ३८ वर्षे
- मागासवर्गीय उमेदवार: १८ ते ४३ वर्षे (०५ वर्षे सूट)
- अंशकालीन उमेदवार: १८ ते ५५ वर्षे
परीक्षा शुल्क:
- खुला प्रवर्ग (Open Category): ₹ १,०००/-
- राखीव प्रवर्ग (Reserved Category): ₹ ९००/-
- माजी सैनिक (Ex-Servicemen): शुल्क नाही
📝 निवड प्रक्रिया व महत्त्वाच्या तारखा
निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा (२०० गुण) आणि मुलाखत (Interview) द्वारे केली जाईल.
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक: १२ ऑगस्ट २०२६ (सकाळी १०:०० वाजल्यापासून)
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १० सप्टेंबर २०२६ (रात्री २४:०० वाजेपर्यंत)
