🚨 ताज्या अपडेट्स 🎯 सराव पेपर: MPSC आणि पोलीस भरती – 12 August 2026 (25 Questions)     |     🎯 Quiz 1     |     🎯 UPSC परीक्षा वेळापत्रक जाहीर! नागरी सेवा, NDA, CDS आणि मुख्य परीक्षांच्या तारखा घोषित     |     🎯 केंद्रीय विद्यालय वाशिम भरती 2026: PRT, TGT आणि PGT पदांसाठी थेट मुलाखत जाहीर!     |     🎯 NTPC भरती 2026: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये 136 जागांसाठी मोठी भरती; पहा सविस्तर माहिती     |    

आदिवासी विकास विभाग भरती 2026: 2421 शिक्षक पदांची पवित्र पोर्टलद्वारे मोठी भरती! ऑनलाईन अर्ज सुरु

📅 प्रकाशित: August 12, 2026 | 📂 श्रेणी: 12वी पास नोकरी, नवीन जाहिरात

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर या अपर आयुक्त आस्थापनेवरील पेसा (PESA) व नॉन-पेसा क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) या संवर्गातील तब्बल 2,421 जागा पवित्र पोर्टलद्वारे भरण्यात येणार आहेत. TAIT 2025 उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

📌 थोडक्यात माहिती

  • विभाग: आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य
  • भरतीचे नाव: पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती 2026
  • एकूण रिक्त पदे: 2,421 जागा
  • पदाचे नाव: प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक)
  • निवड प्रक्रिया: TAIT 2025 गुणांच्या आधारे प्राधान्यक्रम (Preference) लॉक करणे
  • अधिकृत संकेतस्थळ: tribal.maharashtra.gov.in

📅 महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

तपशील दिनांक / मुदत
प्राधान्यक्रम (Preference) Generate सुरु 06 ऑगस्ट 2026 पासून
प्राधान्यक्रम Lock करण्याचा कालावधी 06 ऑगस्ट 2026 ते 13 ऑगस्ट 2026
TAIT 2025 परीक्षेचा कालावधी 27 मे ते 05 जून 2025

🎓 शैक्षणिक पात्रता व पदनिहाय तपशील

पदाचे नाव आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता
प्राथमिक शिक्षक HSC (12वी पास) + D.Ed/D.T.Ed आणि TAIT 2025 परीक्षा उत्तीर्ण + स्व-प्रमाणपत्र पूर्ण. (मराठी व इंग्रजी माध्यम)
माध्यमिक शिक्षक B.A. / B.Sc. + B.Ed. (संबंधित विषय) आणि TAIT 2025 उत्तीर्ण + स्व-प्रमाणपत्र पूर्ण.
उच्च माध्यमिक शिक्षक M.A. / M.Sc. + B.Ed. (संबंधित विषय) आणि TAIT 2025 उत्तीर्ण + स्व-प्रमाणपत्र पूर्ण.

⚙️ प्राधान्यक्रम (Preference) लॉक करण्याबाबत महत्त्वाचे नियम

📝 ऑनलाईन अर्ज व प्राधान्यक्रम कसा नोंदवायचा?

  1. सर्वप्रथम पवित्र पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या (tait2025.mahateacherrecruitment.org.in).
  2. तुमच्या Login ID आणि Password च्या साहाय्याने लॉगिन करा.
  3. Download मेनूमध्ये दिलेल्या आदिवासी विकास विभागाच्या जाहिरातींचा सविस्तर अभ्यास करा.
  4. Generate Preference या पर्यायावर क्लिक करून योग्य ते प्राधान्यक्रम तयार करा.
  5. सर्व प्राधान्यक्रम तपासून 13 ऑगस्ट 2026 पूर्वी Preference Lock करा.
🔗 प्राधान्यक्रम ऑनलाईन लॉक करा
🌐 अधिकृत संकेतस्थळ (Tribal Dept)

डिस्क्लेमर: ही माहिती उपलब्ध अधिकृत माहितीपत्रकावर आधारित आहे. अर्ज करण्यापूर्वी किंवा प्राधान्यक्रम लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित पोर्टलवरील मूळ जाहिरात सविस्तर वाचणे बंधनकारक आहे.

⚠️ सूचना: या संकेतस्थळरील माहिती केवळ उमेदवारांच्या सोयीसाठी देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात व संबधित पोर्टलवरील मार्गदर्शक सूचना सविस्तरपणे वाचून घेणे बंधनकारक आहे.

🚀 मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा!

आमच्या WhatsApp आणि Telegram ग्रुपमध्ये सामील व्हा आणि सर्व अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवा.