| 1. आंतरराष्ट्रीय सन्मान |
भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी राज्यांनी 15 ऑगस्ट 2026 हा दिवस अधिकृतपणे “इंडिया इंडिपेंडन्स डे” म्हणून घोषित केला. |
| 2. कॉर्पोरेट / नेतृत्व |
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन पुनर्नियुक्ती मागणार नाहीत; त्यांचा कार्यकाळ 20 फेब्रुवारी 2027 रोजी समाप्त होईल. ते 2017 पासून टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत. |
| 3. रेल्वे व निर्यात |
पंजाबमधील रेल कोच फॅक्टरी (RCF) कपूरथळा येथून बांगलादेश रेल्वेसाठी 19 ‘LHB’ ब्रॉड गेज डब्यांची पहिली तुकडी रवाना करण्यात आली. हा RITES Ltd द्वारे 200 डब्यांच्या कराराचा भाग आहे. |
| 4. सरकारी योजना |
सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने 23 ऑक्टोबर 2023 रोजी सुरू केलेली ‘SMILE-Beggary’ योजना भिक्षावृत्तीत गुंतलेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनाच्या व्यापक आराखड्यात समाविष्ट केली आहे. |
| 5. संरक्षण तंत्रज्ञान |
कोलकाता येथील GRSE मध्ये भारतीय नौदलाची NGOPV श्रेणीतील दुसरी नौका ‘श्रुती’ (यार्ड 3037) चे जळार्पण करण्यात आले. |
| 6. कला व संस्कृती |
संगीत नाटक अकादमीने 2024 व 2025 साठी अकादमी रत्न, 108 पुरस्कार विजेते आणि 106 युवा कलाकारांसाठी ‘उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्काराची’ घोषणा केली. |
| 7. अर्थव्यवस्था व व्यापार |
पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने इजिप्त, अल्जेरिया, नायजेरिया आणि जॉर्जिया या देशांकडून युरियाची आयात वाढवली असून एप्रिल-जून 2026 मध्ये 52% युरिया या देशांकडून आला. |
| 8. अंतराळ संशोधन |
नासाने (NASA) आर्टेमिस करारांतर्गत आपल्या ‘Moon Base’ प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी इस्रोला (ISRO) आमंत्रित केले आहे. |